सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज मंगळवारी (दि. ४) रोजी ईव्हीएमवर सकाळी नऊ वाजता सुरू झाली. तिसऱ्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य घटले आहे. प्रणिती शिंदे यांना २५ हजार २३४ तर भाजपचे राम सातपुते यांना ३२ हजार २५६ मते मिळाली आहे. या फेरीमध्ये राम सातपुते यांना ७ हजार २२ मते अधिक मिळाली. यामुळे या फेरीचे मताधिक्य घटल्याचे दिसून आले.
तिसऱ्या फेरीमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना १४ हजार ०४५ मते, बहुजन समाज पार्टीचे गायकवाड यांना २२२, भाजपचे यांना राम सातपुते यांना ३२ हजार २५६, वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांना २५२ मते मिळाली आहेत.
हेही वाचा