सोलापूर

Solapur Lok Sabha Election : दुसर्‍या फेरीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे २१ हजार ६७ मतांनी आघाडीवर

अनुराधा कोरवी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज मंगळवारी (दि. ४) रोजी ईव्हीएमवर सकाळी नऊ वाजता सुरू झाली. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मागे टाकत ५ हजार २३८ मतांची प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे सोलापूर शहर उत्तर मतदार संघात ही काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसून आले.

पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना २९ हजार ५२२ मते, बहुजन समाज पार्टीचे गायकवाड यांना २२२, भाजपचे यांना राम सातपुते यांना २४ हजार २८४, वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांना ४९७ मते मिळाली आहेत.

दुसर्‍या फेरीत आमदार प्रणिती शिंदे 21 हजार 67 मतांनी आघाडीवर

सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीत पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मागे टाकत २१ हजार ६७ मतांची प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.

तर दुसऱ्या फेरीमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना ३४ हजार ८९९ मते, बहुजन समाज पार्टीचे गायकवाड यांना २५१, भाजपचे यांना राम सातपुते यांना १९ हजार 0७0, वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांना ४0५ मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये शहर उत्तर मतदार संघात राम सातपुते यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले.

करमाळा मतमोजणी कक्षात एका मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; काही काळ थांबली मतमोजणी

माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा मतमोजणी कक्षात पहिल्या फेरीत १४ पैकी एका मशीनला तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने काही वेळेसाठी मतमोजणी थांबली होती. यामध्ये पहिल्या फेरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत.

आज सकाळी ८ वाजता टपाली मतमोजणी झाल्यानंतर हा निकाल सर्वात शेवटी जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर मात्र, सकाळी ९ वाजता प्रत्यक्षात ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक फेरीला १५ ते २० मिनिटे लागत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT