सोलापूर

सोलापूर : अवैध चोरीच्या वाळूसह ६ लाखांचा मुद्देमाल मोहोळ पोलिसांकडून जप्त

backup backup

मोहोळ, पुढारी वृत्तसेवा :  मुंढेवाडी ता.मोहोळ येथील सीना नदामधून चोरलेल्या अवैध चोरीच्या वाळूसह 6 लाख 7 हजारांचा मुद्देमाल मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतला. शिवाय, आरोपीवर कलम 379 व पर्यावरण अधिनियम 915 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी बाळू व्यवहारे (रा. मुंढेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, शुक्रवारी (दि.१५) पोलीस खासगी वाहनाने मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी  मुंढेवाडी  येथील गोटेवाडी-मुंढेवाडी रोडवर जिल्हा परिषद शाळेजवळ रात्री साडे नऊ वाजता एका ट्रॅक्टरच्या डम्पिंग मध्ये अवैध वाळू असल्याचे दिसले. दरम्यान, पोलिसांनी अवैध वाळू उपसा केलेला ट्रॅक्टर आणि सात हजार रुपये असा एकूण ६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT