Crime News pudhari photo
सोलापूर

Solapur Crime | कोन्हेरीत बेकायदेशीर देशी दारू तयार करणाऱ्या असलेल्या पत्राशेडवर मोहोळ पोलिसांचा छापा!

१ लाख ७८ हजार रुपयांचे साहित्य जप्त, एकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पोखरपुर : मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे शेतातील पत्रा शेड खोलीमध्ये एक जण स्पिरिट, तयार दारू व रिकाम्या काचेच्या बाटल्या, देशी दारू असे छापील असलेले रिकामे बॉक्स, बाटल्या सील करण्याची मशीन, अल्कोहोल मीटर या साहित्याचा वापर करून मानवी शरीरास हानिकारक होईल अशी विषारी नशाकारक देशी दारू बेकायदेशीररित्या तयार करत असल्याची माहिती मिळाल्याने मोहोळ पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता १ लाख ७८ हजार रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले . याप्रकरणी विक्रांत उर्फ भैय्या भीमराव वसेकर रा . टाकळी सिकंदर याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे अरुण वसेकर यांच्या नावे असलेल्या शेतात पत्रा शेडमध्ये काही लोक बनावट देशी दारू तयार करत असल्याबाबतची गोपनीय माहिती दिनांक ३१ ऑगस्ट रोजी मोहोळ पोलिसांच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल पर्वते, पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल जगताप, पोलीस कॉन्स्टेबल योगेश खलाटे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत असे मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी गेले असता, त्यांना त्या ठिकाणी विक्रांत वसेकर हा देशी दारू तयार करण्याच्या साहित्यासह आढळला.

त्यावेळी पोलिसांनी पत्रा शेडच्या खोलीमध्ये जाऊन पाहिले असता, प्लास्टिक कॅन मध्ये भरलेले स्पिरिट, तयार दारू, पाण्याचे भरलेले जार, रिकाम्या काचेच्या बाटल्या, टोपण व देशी दारू असे छापील असलेले रिकामे बॉक्स, बाटल्या सील करण्याचे मशीन, अल्कोहोल मीटर असे साहित्य मिळून आले.

याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने बनावट देशी दारू तयार करून विक्री करत असल्याचे सांगितले. त्यानंतर मोहोळ पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूरच्या पथकाला या संदर्भात माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन त्या ठिकाणाहून बनावट देशी दारू तयार करण्याचे १ लाख ७८ हजार २२५ रुपयांचे सर्व साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी पो. ना. मनीष पवार मोहोळ यांनी विक्रांत वसेकर यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT