अनिकेत गायकवाड
सोलापूर : सोलापूर महापालिका प्रभाग 2 क हा OBC महिलासाठी राखीव आहे. अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला होता. या प्रभाग दोन मध्ये शालन शिंदे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत तर त्याच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्या स्वतः भाजपकडून लढण्यास इच्छुक होत्या.
दरम्यान रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावं यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात झालेल्या भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले. मात्र त्याचं वेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. असा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. उपचारादरम्यान सरवदे यांचा मृत्यू झाला.
भाजपचे सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख ही प्रभाग 2 ड मधून निवडणूक लढवात आहेत हा संपूर्ण प्रभाग 2 बिनविरोध करण्यासाठी विजयकुमार देशमुख गटाकडून प्रयत्न सुरु होता यातून प्रभाग 2 क मध्यही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होतेत. यातूनच भाजपाच्याच दोन गटात आज वाद उफाळून आला. रेखा सरवदे यांनी अर्ज माघार घ्यावा यासाठी दबाव आणला गेला. आणि या सर्व प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्याचा बळी गेल्याचा आरोप मनसे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे.
ह्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मनपा निवडणूकीत उमेदवारीवरुन प्रचंड घमासान सुरु आहे. भाजपाकडुन अनेक इच्छुक आहेत. त्यातच हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता, त्यामुळे सरवदे कुटुंबावर दबाव भाजप नेत्याकडून आणला जातं होता. असाही आरोप होत आहे. तर समाजात वाद नको म्हणून ते सोडवायला मनसे नेते बाळासाहेब सरवदे गेले होते, त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला व यामध्ये त्यांचा बळी गेला असा आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे.