विवस्त्र करुन हॉटेल कामगारास बेदम मारहाण करणाऱ्या मालकास घेतले ताब्यात Pudhari Photo
सोलापूर

Solapur Crime | विवस्त्र करुन हॉटेल कामगारास बेदम मारहाण करणाऱ्या मालकास घेतले ताब्यात

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उडाली होती खळबळः ढेंभुर्णी पोलिसांनी व्हिडीओची दखल घेत केला गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

टेंभुर्णी : - हॉटेल कामगारास नग्न करून लोखंडी पाईपने जबर मारहाण करण्यात आल्याची गंभीर व अमानुष घटना समोर आली आहे. हॉटेल मालकाच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून टेंभुर्णी पोलिसांनी हॉटेल मालक लखन हरिदास माने यास तातडीने ताब्यात घेवून कारवाई केली आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती.समाजमाध्यमावर या मारहाणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून या अमानुष मारहाणीचा सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेची अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी बायपास हायवे येथे हॉटेल 7777 या नावाने हॉटेल आहे. या हॉटेलचा मालक लखन हरिदास माने (रा.टेंभुर्णी) याने त्यांच्याकडे कामास असलेल्या मॅनेजर निवास आप्पासाहेब नकाते (वय- ४४,रा.शिक्षक सोसायटी रोड) टेंभुर्णी यास पूर्ण विवस्त्र करून सर्व कामगारा समक्ष लोखंडी पाईपने पार्श्वभागावर बेदम मारहाण केली होती. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यामावर सर्वत्र व्हायरल होत असून नेटकऱ्यातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. याबाबत निवास नकाते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी लखन माने यास तातडीने ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे.

याबाबत निवास नकाते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काम नीट का करत नाही? तुला जास्त मस्ती आली आहे काय? असे म्हणून लखन माने याने माझ्या अंगावरील सर्व कपडे काढले. माझे खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन मला पूर्ण विवस्त्र करून हॉटेल बाहेर सर्व कामगारांसमोर मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश चौधरी हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT