काँग्रेस पक्ष  (File Photo)
सोलापूर

Solapur News : काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नरोटे, हुंडेकरी, निकाळजे, डोंगरे, टेकाळेंसह 20 जणांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (दि. 27) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी जाहीर केली. यामध्ये शहराध्यक्ष चेतन नरोटे, रियाज हुंडेकरी, प्रतीक्षा निकाळजे, राजनंदा डोंगरे, किरण टेकाळेंसह 20 जणांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक नऊमधून दत्तू बंदपट्टे, प्रभाग 11 मधून धोंडप्पा तोरणगी, प्रभाग क्रमांक 14 मधून शोएब महागामी, बागवान खतिफा नसीम अहमद बशीर अहमद, प्रभाग क्रमांक 15 मधून सबा परवीन आरिफ शेख, चेतन नरोटे आणि मनिष व्यवहारे, प्रभाग क्रमांक 16 मधून फिरदोस पटेल, सीमा मनोज यलगुलवार, नरसिंग नरसप्पा कोळी, प्रभाग क्रमांक 17 मधून शुभांगी विश्वजित लिंगराज, परशुराम छोटुसिंग सतारवाले, वहिद अब्दुल गफूर बिजापुरे, प्रभाग क्रमांक 20 मधून अनुराधा सुधाकर काटकर, प्रभाग 21 मधून प्रतीक्षा प्रवीण निकाळजे, किरण शीतलकुमार टेकाळे, रियाज इब्राहिम हुंडेकरी, प्रभाग 22 मधून संजय चन्नवीरप्पा हेमगड्डी, राजनंदा गणेश डोंगरे, दीपाली सागर शहा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT