

बार्शी : बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरी येथे माहेरी आलेल्या विवाहितेची बेकायदेशीर पद्धतीने सोनोग्राफी करून व गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पंढरपूर येथील एका महिलेसह तिघांवर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृषाली वैभव मोरे (वय 28, रा. बोरगात (काळे) ता.जि. लातूर सध्या रा. श्रीपतपिंपरी ता. बार्शी) असे या प्रकरणात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. विकास पवार रा. पंढरपुर (पुर्ण पत्ता माहित नाही) व अन्य दोघे अशी या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस कर्मचारी अभिजीत गाटे यांनी तालुका पोलीसात फिर्याद दिली.
वृषाली मोरे ही बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पीटल येथे मयत झाल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. मयताच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूबाबतचा अभिप्राय मिळण्यासाठी ग्रामीण रूग्णालयाच्या वैदयकिय अधिकार्यांना अहवाल दिला. दरम्यान खबर्यामार्फत वृषाली हिचा मृत्यू गर्भपातामुळे झाल्याची माहिती मिळाल्याने मयत वृषाली नातेवाईकांचा तसेच संशयीत इसमांचा मोबाईल क्रमांकाचे सी.डी.आर काढण्यात आले.त्यानुसार वृशाली हिला लग्नानंतरएक मुलगी झाली. त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहीली होती. पंढरपुर येथे दर्शना करीता जात असल्याचे सांगून ती विकास पवार नामक व्यक्तीकडे मला दुसरा मुलगा आहे की मुलगी आहे. याची तपासणी करण्यास सांगितले. तेथे पवार व एका महिलेने सोनोग्राफी केली. त्यांनी तिला मुलगी असल्याचे सांगीतले होते. तिने जवळील रोख विस हजार रूपये विकास पवार यास दिले.सोनोगाफी केलेल्या महिलेनेगर्भ खाली करायच्या गोळ्या दिल्या. दरम्यान मुलगी वृषाली ही घरातील गादीवर चक्कर येवूनपडल्याने उपचारा करीता बाशीं येथे नेले असता डॉक्टरांनी मुलगी वृषालीस चेक करून ती मयत झाली असल्याचे सांगीतले, माझे मुलीची विकास पवार व त्याचे सोबत असलेली एक महिला व एक पुरुष यांनी सोनोग्राफी करून तिला मुलगी आहे असे सांगून वृषालीला तिच्या पोटातील गर्भ खाली करण्या करीता औषध गोळया देवून तिचा गर्भपात केला. त्याचाच त्रास होवून ती मरण पावली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.