Solapur Airport Aircraft Accident : सोलापूर विमानतळावरील शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. शिकाऊ वैमानिकाचे विमान टेक ऑफ करताना धावपट्टीवरून घसरल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच धावपट्टीवरून खाली गेल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवाने विमानातील शिकाऊ वैमानिक महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही.
दरम्यान, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून यााबाबत अद्याप कोणती अधिकची माहिती देण्यात आलेली नाही. विमानतळावर अॅम्बुलन्स तसेच पोलीस अधिकारी देखील दाखल झाले आहे.