रोहन पवारने Pudhari Photo
सोलापूर

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत अंकोलीच्या रोहन पवारने पटकावले सुवर्णपदक

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : 'महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या ' वतीने सिल्लोड (जि.संभाजीनगर) येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या 'स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतमोहोळ तालुक्यातील अंकोलीचे सुपुत्र रोहन अण्णासाहेब पवार यांनी सुवर्णपदक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सिल्लोड (जि.संभाजीनगर) या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या.

या स्पर्धेत गंगावेस तालमीचे पैलवान व अंकोली गावचे सुपुत्र रोहन अण्णासाहेब पवार याने ९७ किलो वजन गटात आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल गंगावेस तालमीचे वस्ताद विश्वास दादा हरगुले व मोहोळचे पैलवान चंद्रकांत काळे यांनी त्याचे अभिनंदन केले. त्याच्या या यशाबद्दल अंकोली ग्रामस्थातून कौतुक केले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT