विनेश फोगाटने जिंकली राजकारणाच्या मैदानावरील पहिली कुस्ती

Vinesh Phogat | काँग्रेसला धक्का देत अपक्ष सावित्री जिंदाल विजयी
Vinesh Phogat   victory in Haryana assembly election
काँग्रेस उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी जुलाना मतदारसंघातून विजय मिळवला.Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये काँग्रेस उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी जुलाना मतदारसंघातून विजय मिळवला. तर हिसार मतदार संघातून उद्योजिका सावित्री जिंदाल यांनी अपक्ष लढत विजयी पताका फडकवली. हरियाणा विधानसभेच्या निकालात या दोन राजकीय पटलावरील महिलांच्या विजयाची चर्चा देशभरात होत आहे.

विधानसभेच्या राजकीय पटलावर पात्र ठरल्या

कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) हरियाणा विधानसभेत जुलाना मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. भाजप उमेदवार योगेश बैरागी यांचा त्यांनी पराभव केला. सुरुवातीला मतमोजणीत विनेश फोगाट मागे होत्या. नंतरच्या फेऱ्यांमध्ये मात्र त्यांनी आघाडी कायम ठेवली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये काहीशा जास्त वजनामुळे विनेश फोगाट कुस्तीच्या अंतिम फेरीपुर्वी अपात्र ठरल्या होत्या. सबंध देश सुवर्णपदकाची अपेक्षा करत असताना पदकापासुनच मुकावे लागले होते. विधानसभेच्या राजकीय पटलावर मात्र त्या पात्र ठरल्या आहेत आणि राजकीय वजन देखील या निमित्ताने वाढले आहे.

विनेश फोगाटने राजकीय कुस्तीच्या मैदानात लढणे पसंत गेले

हरियाणा विधानसभा निवडणुकीत चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी विनेश फोगाट (Vinesh Phogat) हा एक प्रमुख चेहरा होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विनेश फोगाटला काहीशा अतिरिक्त वजनामुळे ऑलिंपिकमधून अपात्र व्हावे लागले, यावर संबंध देशाने दुःख व्यक्त केले होते. त्यानंतर कुस्तीला रामराम ठोकत विनेश फोगाटने राजकीय कुस्तीच्या मैदानात लढणे पसंत गेले. काँग्रेस उमेदवार म्हणून जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली.

विनेश फोगाटचे देशभरातून अभिनंदन

विनेश फोगाटने निवडणूक जिंकल्यानंतर देशभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. ‘संपूर्ण देश आदिशक्तीचा उत्सव साजरा करत असताना बलाढ्य आव्हानांना, अन्यायाला पुरून उरलेल्या "स्त्री शक्ती"चा हा विजय सुखावणारा आहे.’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विनेश फोगाटचे अभिनंदन केले आहे. तर कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया,अन्य खेळाडूंसह विविध क्षेत्रातील लोकांनी देखील विनेश फोगाटचे अभिनंदन केले आहे.

Vinesh Phogat   victory in Haryana assembly election
हरियाणा निवडणूक निकालात विलंब, काँग्रसचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news