हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर सोलापुरात मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur Maratha Community Celebration | सोलापुरात मराठा समाजाचा जल्लोष

आनंदोत्सवाला उधाण; गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजीने दणाणला परिसर

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आले असून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सोलापूर शहरात विविध भागांत गुलालाची मुक्त उधळण, फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

सकल मराठा समाजाच्या वतीने सायंकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी समन्वयक राजन जाधव, पद्माकर काळे, श्रीकांत डांगे, भाऊसाहेब रोडगे, रवी मोहिते, शंतनू साळुंखे आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माजी नगरसेवक अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष करण्यात आला. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गुलालाची उधळण करण्यात आली. माजी नगरसेवक अनंत जाधव, नाना मस्के, योगेश पवार, सुनील हुंबे, शशिकांत शिंदे, शेखर फंड आदी उपस्थित होते. मरीआई चौक येथे पेढे वाटपानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. महादेव गवळी, चंद्रकांत पवार, लहू गायकवाड, हेमंत पिंगळे, श्याम गांगर्डे, शेखर कवठेकर उपस्थित होते. मरीआई चौकात डॉ. आंबेडकर पुतळा, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

हा संविधानाचा खूप मोठा विजय आहे. याचा लाभ शिक्षण, नोकरी आणि राजकारणात खूप मोठा होणार आहे. सर्वसामान्य अल्पभूधारक, कष्टकरी, शेतकरी मराठा समाजाला याचा लाभ होणार आहे.
माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज, सोलापूर
महायुती सरकारने मागणी मान्य करून समाजाला न्याय दिला. या जीआरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात, नोकरीत, बढतीत मोठी मदत होणार आहे.
अमोल शिंदे, मराठा क्रांती मोर्चा

महायुती सरकारने मागणी मान्य करून समाजाला न्याय दिला. या जीआरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात, नोकरीत, बढतीत मोठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT