स्लॉट उपलब्धतेनंतर मुंबईसाठी रोज विमानसेवा file photo
सोलापूर

Mumbai Daily Flight Service Delay | स्लॉट उपलब्धतेनंतर मुंबईसाठी रोज विमानसेवा

आणखी काही दिवस करावी लागणार प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मुंबई विमानतळावर आठवड्यातील सातही दिवस विमान सेवा सुरू करण्यासाठी स्लॉट उपलब्ध होत नसल्याने तूर्त तरी आठवड्यातून पाच दिवस विमानसेवा सुरू राहणार आहे. रोजच्या विमान सेवेसाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

15 ऑक्टोबरपासून सोलापूर-मुंबई विमान सेवेस प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विमान उडान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विमान सेवेस प्रारंभ झाला. त्यानंतर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे 1 नोव्हेंबरपासून सोलापूर ते मुंबईसाठी रोज विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. त्याबाबतची घोषणा संबंधित विमान सेवा कंपनीने जाहीर केली होती. परंतु मुंबई विमानतळावर सात दिवसांचा स्लॉट मिळवण्यात अडथळा आल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोज विमान सेवेसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. पहिल्या आठवड्यात पाच दिवस विमान सेवा सुरू राहणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यापासून आठवड्यातील सातही दिवस विमान सेवा सुरू करण्यासाठी विमान सेवा कंपनीकडून सर्व स्तरावरुन जिकरीचे प्रयत्न सुरू आहेत.

सोलापूर-गोवा विमान सेवेला मिळणार्‍या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आता फ्लाय 91 विमान कंपनीकडून रोज विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सध्या कंपनीकडे तीन एअरक्राफ्ट असून, लवकरच कंपनीच्या ताफ्यात चौथे विमान दाखल होणार आहे. चौथे विमान आल्यानंतर रोजची विमान सेवा सुरू होणार आहे.

सध्या पाच दिवस विमान सेवा

ऑक्टोबर महिन्यातील 16 दिवस विमान सेवा ही चार दिवसांसाठी सुरू झाली. त्यानंतर आता 1 नोव्हेंबरपासून सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार असे पाच दिवस विमान सेवा सुरू राहणार आहे. त्यानंतर आठवड्यातील सातही दिवस विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. याची सोलापूरकरांना उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT