अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने तिरडी आंदोलन केले.  Pudhari News Network
सोलापूर

अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी मोहोळ येथे तिरडी आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर: पुढारी वृत्तसेवा : अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी तसेच मोहोळ शहरातील तरुणांनी तिरडी आंदोलन काढत जोरदार घोषणाबाजी केली. तिरडी आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. Solapur News

गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलने, उपोषणे सुरू

गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गाने मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलने, उपोषणे सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून मोहोळ तहसील कार्यालयासमोर मोहोळ शहरातील ४ तरुण आमरण उपोषण करत आहेत. मोहोळ शहरातील बाजारपेठ तीन दिवस पूर्णतः ठप्प होती. त्यानंतर ही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने मोहोळ शहरातील संतप्त सर्वपक्षीय युवक कार्यकर्त्यांनी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपूला खालून आमदार यशवंत माने यांचा फोटो लावलेले तिरडी आंदोलन काढले.

मुख्य रस्त्यावरून हे आंदोलन तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर आजी- माजी आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलनात घुसून तिरडी ओढून बाहेर काढून नेली. यावेळी मोहोळ शहरासह तालुक्यातील सर्वपक्षीय युवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT