Mental Health Awareness  
सोलापूर

Mental Health Awareness |मोबाईलने घेतला 13 वर्षांच्या चिमुरड्याचा बळी! पेनूरमध्ये यशराज डोकेने राहत्या घरी संपवली जीवनयात्रा

Mental Health Awareness |या प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे करीत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा

मोबाईल वापरण्यास का दिला नाही म्हणून १३ वर्षाच्या मुलाने राहत्या घरी साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१ मार्च रोजी सांय. ७ वा पुर्वी मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे घडली. यशराज धर्मराज डोके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे धर्मराज डोके हे कुटुंब समावेत राहण्यास असून शेती करून उपजीविका करतात. दि. १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? म्हणून स्वतःहून राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगल ला साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला होता.

तो घराची कडी का उघडत नाही म्हणून कुटुंबीयांनी लोखंडी रॉड घालून कडी तोडली. गळफास घेतलेला दिसला. त्याला तात्काळ पेनुर येथील खाजगी रुग्णालयात व त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT