परितेवाडी : परितेवाडी येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदाची निवडणूक गुरूवारी (दि. ३०) सोसायटीच्या कार्यालयात पार पडली. विद्यमान चेअरमन कालीचरण गोरे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत सोसायटीचे ज्येष्ठ संचालक मोहन अनंता (तात्या) चव्हाण यांची सर्व संचालकांच्या एकमताने बिनविरोध चेअरमनपदी निवड करण्यात आली.
निवडीनंतर व्हाईस चेअरमन कल्याण अंकुश शिंदे तसेच माजी चेअरमन कालीचरण गोरे यांनी नवनिर्वाचित चेअरमन मोहन चव्हाण यांचा सत्कार केला.
या वेळी सोसायटीचे संचालक कृष्णा अनंता भोळे, कालीचरण गोरे, कल्याण अंकुश शिंदे, सुदाम चट्टे, बाळासाहेब चव्हाण, नानासाहेब वाघदरे, पोपट डोळसे, चंद्रकांत जाधव, उर्मिला पांडुरंग कदम, मंगल निवृत्ती कदम आदी उपस्थित होते.
तसेच गणेश कदम, गणेश शिंदे, सर्जेराव चव्हाण, आबा गोरे, दिगंबर साळुंखे, हिम्मत पवार, लक्ष्मण चव्हाण, नितीन चव्हाण, गोपाळ चव्हाण, भैय्या चट्टे, राजेंद्र चव्हाण, तुकाराम बबन हनुमंत कदम, दादा शिंदे, अंकुश चव्हाण, अण्णा चव्हाण, मधुकर पवार, कांतीलाल कदम, सिद्धेश्वर कदम, हनुमान जाधव, विष्णू चव्हाण, महेश चव्हाण, साहेबराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल. पी. बागल यांनी काम पाहिले, तर सचिव अनिल मोहिते यांनी सहकार्य केले.