विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल Pudhari Photo
सोलापूर

सोलापुरात गणपती विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल

अशी असेल मिरवणूक अन् पर्यायी मार्ग

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

गणेश विसर्जन मिरवणुक मंगळवारी (दि.17) रोजी काढण्यात येणार असून, या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी काही ठिकाणावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. सकाळी सहावाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गातील बदल लागू असल्याची अधिसूचना पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी शनिवार (दि.14) रोजी काढले.

शहरातील मुख्य मिरवणुकीसह इतर लहान-मोठ्या मंडळांच्या मिरवणुका, घरोघरच्या गणेशमूर्तींचे विसर्जन घाटावर तसेच इतर विविध ठिकाणी मूर्ती संकलन तसेच विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी अपघात अगर काही गोंधळ होऊ नये, यासाठी प्रत्येक विसर्जन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीगणेश विसर्जन निमित्त होणार्‍या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने शहरात कडक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील नऊही मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी (दि.17) सप्टेंबरला विर्सजन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या अनुषंगाने एका दिवसासाठी शहरातील वाहतूक मार्गात मोठा बदल करण्यात आला आहे.

शहरात जडवाहतुकीस बंदी ही मिरवणूक संपेपर्यंत असणार आहे. बंदीमध्ये मार्केट यार्ड चौक-जुना बोरामणी नाका-शांती चौक-अक्कलकोट रोड हा मार्ग जडवाहतुकीस येण्या-जाण्यास सुरू राहील, असेही पोलिस आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे. तर गणपती विसर्जन मिरवणूक दिवशी पोलिसांची वाहने, अत्यावश्यक वाहने (रुग्णवाहिका, दवाखान्यांची वाहने, अग्निशामक वाहने, संरक्षित व्यक्तींची वाहने) यांना शहरातून प्रवास करण्यास परवानगी असेल. बुधवार (दि.18) सप्टेंबरपासून सर्व वाहतुकीचे मार्ग पूर्ववत होतील.

गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकांचा मार्ग (बंद करण्यात आलेला मार्ग) :

लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचा मिरवणूक मार्ग :

पत्रा तालीम-सळई मारुती-गवंडी गल्ली-मल्लिकार्जुन मंदिर-बाळीवेस-तरटीनाका पोलिस चौकी-पांजरापोळ चौक-मेकॅनिक चौक-सरस्वती चौक-लकी चौक-आसार मैदान ते गणपती घाट.

मध्यवर्ती गणेशोत्सव विसर्जन मार्ग :

दत्त चौक-राजवाडे चौक-गंगा विहीर (नवी पेठ)-चौपाड-विठ्ठल मंदिर-बालाजी मंदिर-पंजाब तालीम-मल्लिकार्जुन मंदिर-बाळीवेस-चाटीगल्ली-मंगळवार पेठ पोलिस चौकी-मधला मारुती-माणिक चौक-कसबा पोलिस चौकी-खाटीक मशीद-हाजीमाई चौक ते गणपती घाट.

पूर्व विभाग गणेशोत्सव मंडळ :

कन्ना चौक-जुनी जोडभावी पेठ पोलिस चौकी-वडलकोंड निवास-नेताजी नगर-भुलाभाई चौक-मार्कंडेय चौक-जोडबसवण्णा चौक-भद्रावती पेठ-सरकारी रूग्णालय-दत्त नगर-कुचन नगर-पद्मशाली चौक-जगदंबा चौक-जेलरोड पोलिस ठाणे-किडवाई चौक-बेगम पेठ चौकी-पंचकट्टा-पठाण बागेसमोरून विष्णू घाट.

लष्कर विभाग गणेशोत्सव मंडळ :

नळबाजार चौक-पेंढारी मस्जिद -मुर्गीनाला-सतनाम चौक-कुंभारगल्ली-मौलाली चौक-जगदंबा चौक-हुमा मेडिकल-सात रस्ता-शासकीय दुध डेअरी-पत्रकार भवन चौकमार्गे कंबर तलाव (धर्मवीर संभाजी तलाव).

विजापूर नाका मध्यवर्ती मंडळ :

विजापूर नाका बसस्टॉप-आयटीआय पोलिस चौकी-जुना विजापूर नाका-धर्मवीर संभाजी तलाव.

होटगी रोड मध्यवर्ती मंडळ :

महावीर चौक-बच्चुवार बंगला-पत्रकार भवनमार्गे धर्मवीर संभाजी तलाव.

घरकुल मध्यवर्ती मंडळ :

पंचमुखी देवस्थान-वैष्णवी मारुती मंदिर चौक-संभाजी शिंदे हायस्कूलसमोरून पोषम्मा चौक-महालक्ष्मी चौक-सागर चौक-विजय मारूती चौक-नवनीत चौक-वळसा घेऊन गणेश मंदिर-बी ग्रुप-श्रीनेत्र चौकातून म्हाडा विहीर.

निलम नगर मध्यवर्ती मंडळ :

दुर्गादेवी मंदिर-निलम नगर-सिद्धेश्वर चौक-माजी आमदार दिलीप माने संपर्क कार्यालय-मानाचा शिवगणेश मंदिर-करली चौक-बनशंकरी हॉटेल-पद्मा ट्रेडर्स-गवळी वस्ती-परळकर विहीर.

दुचाकी, तीनचाकी अन् चारचाकी प्रवासी वाहनांसाठी (पर्यायी मार्ग) :

  • रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डकडे येणार्‍या वाहनांसाठी विजापूर नाका-आय.टी.आय पोलिस चौकी-निर्मिती विहार-लिमयेवाडी चौक-सलगर वस्ती पोलिस ठाणे समोर-सलगरवाडी-नागोबा मंदिर-रेल्वे स्टेशन तसेच मरिआई चौक-शेटे नगर बोगदा-निराळेवस्ती-हॉटेल अ‍ॅम्बेसेडर-एसटी स्टॅण्ड असा पर्यायी मार्ग असेल.

  • शहरातून ये-जा करणार्‍या चारचाकी प्रवासी वाहनांसाठी जुना पुना नाका, जुना तुळजापूर नाका, जुना बोरामणी नाका, अशोक चौकमार्गे शहरात येण्याचा मार्ग असेल.

  • विजयपूरहून पुणे व हैदराबादकडे जाणार्‍या वाहनांसाठी नवीन विजापूर नाका येथून नवीन बायपासमार्गे केगाववरून सोलापूर विद्यापीठमार्गे पुढे.

  • पुणे रोडकडून विजयपूरकडे जाणार्‍या वाहनांसाठी नवीन पुना नाका येथून नवीन बायपासमार्गे विजयपूर रोडकडे.

  • हैदराबादहून पुणे-विजयपूरकडे जाणार्‍या वाहनांसाठी नवीन हैदराबाद नाका-जुना हैदराबाद नाका-मार्केट यार्ड-नवीन पुना नाका-नवीन केगाव बायपासमार्गे पुढे.

  • बार्शी रोडवरील वाहनांसाठी बार्शी रोड टोल नाका येथून खेडमार्गे केगाव ब्रिज हा पर्यायी मार्ग राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT