सोलापूर : रेल्वे प्रशासनानाने रेलवन अॅप विकसित केले आहे. तिकिटे बुक करणे, ट्रेन ट्रॅक करणे, अन्न ऑर्डर करणे किंवा तक्रार करणे या सर्व सुविधा रेलवन अॅपद्वारे उपलब्ध होत आहे.
प्रवाशांना अखंड सेवा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करून सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआरआयएस) च्या 40 व्या स्थापना दिनी नवी दिल्लीत इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे लाँच केले गेले. प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत काम केले आहे. आधुनिक गाड्या, स्टेशन पुनर्विकास व जुन्या डब्यांचे अत्याधुनिक (एलएचबी) कोचमध्ये रूपांतर करणे व प्रवासात रेलवन हे एकीकृत प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले आहे. जे रेल्वे सेवेतील प्रवेश सुलभ व आधुनिककरते.
आरक्षित तिकीट बुकिंग
आर-वॉलेट वापरून 3 टक्के सवलतीसह अनारक्षित यूटीएस तिकिटे
लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग व रिअल-टाइम चौकशी
ई-केटरिंगद्वारे फुड ऑर्डर
तक्रार निवारण प्रणाली
प्लॅटफॉर्म तिकिटे
तिकीट रद्द करणे
पीएनआर सेवा
एका अॅपद्वारे अनेक सेवांमध्ये प्रवेश
वेळ, प्रयत्न व कागदपत्रे वाचवते
पारदर्शक, आधुनिकतेसह प्रतिसाद देणारी प्रणाली
तक्रारी व सेवा विनंत्यांचे जलद निराकरण
प्ले स्टोअर व अॅप स्टोअरवरून रेलवन डाउनलोड करा
विद्यमान रेलकनेक्ट किवा यूटीएस क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा किंवा नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा
मध्य रेल्वे सोलापूररेलवन अॅप हे रेल्वेच्या प्रवाशांसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत व तसेच वेळ वाचवणारे प्लॅटफॉर्म आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग काढण्यापासून ते गाडीच्या स्थितीपर्यंतची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार असून रेल्वे प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे सोलापूर