सोलापूर

सोलापूरच्या विमानसेवेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात

backup backup

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर विमानतळाच्या विषयावरुन आमदार प्रणिती शिंदे या विधीमंडळात चांगल्याच अक्रमक झाल्या. सरकार बदलले की नियम अटी बदलतात का? असा थेट सवाल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केला. सिध्देश्‍वर कारखान्याची चिमणी पाडताच विमानसेवा सुरु होईल, असे सांगितले हेाते. मग का विमानसेवा सुरु झाली नाही सांगा केवळ राजकारण म्हणून आणि शेतकर्‍यांना त्रास देण्यासाठी चिमणी पाडली का? असा प्रश्‍न आ प्रणिती शिंदे यांनी उपस्थित करताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत चांगला गोंधळ केला.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सोलापूर शहरमध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील होटगी रोड आणि बोरामणी येथील प्रस्तावित विमानतळाचा विषय उपस्थित केला. नव्याने प्रस्तावित असलेल्या सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाला परवानगी मिळते आणि बोरामणी विमानतळाला केवळ माळढोकचे कारण सांगून प्रलंबित ठेवले जाते. हा दुजाभाव कशासाठी करता? सोलापूरातील होटगी रोड वरील विमानतळाला आडथळा ठरते म्हणून कारखान्याची चिमणी पाडली यावेळी प्रचंड पोलीस बळाचा वापर करण्यात आला. अनेकांना अटक करण्यात आली शासनाने केवळ राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केली का असा सवाल थेट आ प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला तो पर्यंत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी  प्रणिती शिंदे यांची बाजू लावून धरली त्यामुळे सभागृहात बराचवेळ गोंधळ झाला. माळढोकसाठी सेालापूरकरांना वेटीस धरु नका, अशी विनंती पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

यावेळी दक्षिण सेालापूर तालुक्याचे भाजपाचे आ सुभाष देशमुख यांनी याविषयात उडी घेतली विमानसेवा सुरु व्हावी यासाठी आम्हीही आग्रही आहोत मात्र कॉग्रेस आमदार चिमणी पाडकामामध्ये राजकारण केल्याचा आरोप करीत आहेत. तो आरोप चुकीचा आहे. यामागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही त्यामुळे दिशाभूल करु नका, चिमणी पाडकामाचे आदेश कोर्टाने दिलेले होते त्याची आमंल बजावणी केवळ महापालिकेने केली आहे. यामध्ये कोणाचा ही कसला ही स्वार्थ नसल्याचा खुलासा सुभाष देशमुख यांनी केला. त्यामुळे सेालापूरच्या विधानसेवेचे चांगलेच पडसात राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनात उमठल्याचे दिसून आले.

सोलापूरची विमानसेवा आणि बोरामणी विमानतळाला माळढोकचा आडथळा या विषयावर कॉग्रेसच्या आ प्रणिती शिंदे या चांगल्याच अक्रमक झाल्या होत्या. त्यांनी सरकार बदलले की कायदे नियम अटी बदलतात काय असा प्रश्‍न थेट विधानसभा अध्यक्षांना केला. सुरत-चेन्नई महामार्गाला माळढोकचा आडथळा नाही तर मग बोरामणी विमानतळालाच का असा प्रश्‍न उपस्थित करित केवळ विरोधासाठी राजकारण करु नका असा इशारा ही आ प्रणिती शिंदे यांनी सरकारला दिला.

चिमणीच्या मागे कसले राजकारण नाही ः आ देशमुख

चिमणी पाडकामासाठी कोर्टाने आणि प्रदुषण महामंडळ, पर्यावरण महामंडळाने तसेच महापालिकेने आक्षेप घेतलेला होता.त्यामुळे ही कारवाई कायदेशीर झाली आहे. मात्र आ प्रणिती शिंदे या सत्ताधार्‍यावर चुकीचा आरोप करित आहेत ते चुकीचे असून यामध्ये कोणत्यही प्रकारचे राजकारण नाही केवळ सोलापूरची विमानसेवा सुरु व्हावी एवढीच आमची भावना असल्याचे मत आ सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT