सोलापूर

सोलापूर : माहेरहून पैसे आणण्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पतीसह दोघांवर गुन्हा

अमृता चौगुले

मंगळवेढा (सोलापूर); पुढारी वृत्तसेवा : माहेरहून चारचाकी वाहन व शेती घेण्यासाठी २ लाख आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी ५० हजार रुपये अशी रक्कम घेवून ये म्हणून एका २२ वर्षीय विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्या प्रकरणी पती प्रविण अभिमान सोनवले, दीर राहुल अभिमान सोनवले, सासरे अभिमान सोनवले (रा.मेथवडे ता.सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार काजल प्रवीण सोनवले (रा.मेथवडे, ता.सांगोला) हिचे माहेर मंगळवेढा असून तिचा मेथवडे येथील प्रवीण अभिमान सोनवले यांच्याबरोबर १६ ऑगस्ट २०२० रोजी विवाह झाला आहे. गेली दोन वर्षांपासून फिर्यादी ही माहेरी मंगळवेढा येथेच राहण्यास आहे. लग्न झाल्यापासून पहिले दोन महिने आरोपी पतीने नीट संभाळ केला. त्यानंतर दि. २२ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी तीन वाजता प्रवीणने तुझ्या आईकडून चारचाकी वाहन व शेती घेण्यासाठी तसेच ओटी भरण्यासाठी पैसे घेवून ये असा तगादा लावला.

फिर्यादीने आईची परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने पैसे देवू शकत नाहीत असे म्हणताच त्यांनी फिर्यादीस घरातून शिवीगाळी, मारहाण करुन माहेरी पाठविले. फिर्यादी ही गर्भवती असल्याने ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सोन्याची अंगठी व ५० हजार रुपये खर्चासाठी घेवून ये असा तगादा लावला. पैसे आणल्याशिवाय तु सासरी येवू नको, आल्यास तुला खोलीत नेवून मारुन टाकीन अशी धकमी दिल्याने तेव्हापासून पीडित काजल माहेरी रहात आहे.

या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT