सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे दि. 15 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौर्यावर येत आहेत. जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, प्रतिष्ठित व्यक्ती, आजी-माजी खासदार व आमदार, जिल्ह्यातील सर्व अधिकारी, राजकीय नेते, राजकीय पक्ष, जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी यांच्याशी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे ते संवाद साधणार आहेत.
दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी ते सोलापूरहून पुढील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. हा दौरा यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा व दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी दिल्या आहेत.