टेंभुर्णी : तुला नीट काम करता येत नाही, ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आण, या व इतर कारणाने सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक व मानसिक त्रासास कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना आज गुरुवारी सकाळी घडली आहे. माढा तालुक्यातील मौजे दहिवली येथे सासरी नवरा, सासू व सासरा यांनी छळ केल्याने काजल नारायण मिस्किन (वय 30) रा. दहिवली या विवाहितेने जीवन संपविले. पती नारायण विलास मिस्किन, सासू शोभा विलास मिस्किन, सासरा विलास रामचंद्र मिस्किन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तिन्ही आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. लक्ष्मण दिगंबर वागज (24) रा. बावी, ता. माढा, जि. सोलापूर यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटले आहे की, काजल हिचे 2019 मध्ये नारायण विलास मिस्किन याच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर तिला एक वर्ष व्यवस्थित नांदविले. त्यानंतर नवरा नारायण मिस्कीन, सासरे विलास मिस्किन, सासू शोभा मिस्किन यांनी छळ केला. दोन दिवसांपूर्वी 18 ऑगस्ट रोजी दाजी नारायण मिस्किन यांचे ऑपरेशन झाल्याने आई, बहीण, मावस बहीण, दोन मावशी इतरजण भेटून आले होते. तेव्हा तिने आईजवळ होत असलेल्या त्रासाबद्दल व ट्रॅक्टर घेण्यासाठी सात लाख रुपये आण म्हणत आहेत. त्यासाठी लाकडाने व हाताने मारहाण केल्याचे सांगितले होते.
पती नारायण विलास मिस्किन, सासू शोभा विलास मिस्किन, सासरा विलास रामचंद्र मिस्किन यांना केली अटक
दरम्यान, पैशाची जुळवाजुळव करीत आहे, अजून चार दिवस थांबा असे सांगितले असता.तूझ्या बहिणीस व्यवस्थित नांदायचे का नाही हे मीच ठरवणार आहे असे म्हणून त्याने फोन कट केला.घरी आल्या नंतर माझी आई व भाऊ यांना दाजी नारायण मिस्किन यांचा पैशासाठी फोन आला होता असे सांगितले होते. 21 ऑगष्ट रोजी सकाळी सात वा.सुमारास फोन करून कळले की, काजल हिने गळफास घेतला आहे. ती मयत झाली आहे. अधिक तपास पोसई अजित मोरे हे करीत आहेत.