सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत पात्रात 71 हजार 600 क्युसेक तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार 663 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नीरा नरसिंहपासून भीमा नदीत हे पाणी इशारा पातळीवरून वाहत आहे. भीमा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती होण्याची शक्यताही आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकर्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने दौंड येथून सुमारे 45 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग उजनीत मिसळत आहे. उजनी धरण सध्या 97 टक्के भरले आहे. यामुळे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेल्या विसर्गामध्ये वाढ करून दि. 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. 70 हजार क्युसेक तर वीज निर्मितीसाठी प्रकल्पासाठी 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या शेतकर्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा.पो.मोरे यांनी केले आहे.
पाण्याचा प्रवाह - 70 हजार 459 क्युसेक (453 मीटर)
इशारा पातळी - 451.50 मीटर
धोका पातळी - 459.03 मीटर
पाण्याचा प्रवाह - 41 हजार 798 क्युसेक (440.20 मीटर)
इशारा पातळी - 443 मीटर
धोका पातळी - 445 मीटर