बार्शी : भोयरे शिवारात तालुका पोलिसांनी कारवाई करुन पकडलेला गांजा. वाहनात गांजा पोत्यात भरुन ठेवण्यात आला होता.  (Pudhari File Photo)
सोलापूर

Vehicle Seized Drug Case | कोट्यवधीचा गांजा जप्त; वाहनांसह एकाला अटक, तिघे फरार

पाठलाग करून पकडले; बार्शी ते भूम मार्गावरील भोयरे शिवारात तालुका पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : ट्रक मधून रासायनिक खताची वाहतूक होत असल्याचे भासवत खतासोबत गांजाच्या गोण्या भरून नेताना तालुका पोलिसांनी एक कोटी 38 लाख 40 हजार रुपये किमतीचा गांजा व 25 लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त केली. एकास पाठलाग करून अटक केली. ही कारवाई गुरुवारी सकाळी बार्शी ते भूम मार्गावरील भोयरे शिवारात करण्यात आली.दरम्यान तिघे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

अंकुश दशरथ बांगर रा. भोयरे ता. बार्शी असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. घटनास्थळी उप विभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, पो नी. बालाजी कुकडे, स.पो.नी. दिलीप ढेरे यांच्यासह शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी भेट दिली.

बार्शी शहरापासून सात किलोमीटर अंतरावर भोयरे शिवारात असलेल्या एका वस्तीजवळ रस्त्याचे कडेला एका कंटेनर ट्रॅक मधून दुसर्‍या आयशर टेम्पोमध्ये गांजाची पोती भरली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक व टेम्पोत पाहणी केली. दरम्यान आरोपींना पोलिसांचा सुगावा लागताच तेथून तिघेजण पळून गेले.दरम्यान पळून जाणार्‍या भोयरे येथील एकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ट्रक व टेम्पोमधून 692 किलो वजनाचा एक कोटी 38 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे तर 25 लाखाची तीन वाहने असा एकूण एक कोटी 63 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुरुवारी दुपारी सुरू करण्यात आलेली गांजांच्या गोण्याची मोजदाज रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती. अधिक तपास सपोनी दिलीप ढेरे करत आहेत.

ही कामगिरी जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो नी बालाजी कुकडे, स.पो.नी. दिलीप ढेरे, अभय उंदरे,मंगेश बोधले, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, सागर शेंडगे, उत्तरेश्वर जाधव, अविरत बरबडे, राहुल बोंदर, यांच्या पथकाने केली.

ही वाहने केली जप्त

ट्रक क्रमांक एम एच 43 वाय 8947, टेम्पो क्रमांक एम एच 14 इएम 9833 व स्विफ्ट कार क्रमांक एम एच 14 इ सी 4536 ही तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT