Solapur Crime News : झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्‍न  File Photo
सोलापूर

Solapur Crime News : झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्‍न

श्री सीताराम महाराज यांच्या पावन नगरी खर्डी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Attempted murder by throwing a stone at a sleeping person's head

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

खर्डी ( ता. पंढरपूर) येथील सद्गुरू सीताराम महाराज मंदिर परिसरात झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला आहे. महिबूब इब्राहिम आतार (रा.खर्डी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

महिबूब आतार हे नेहमीप्रमाणे खर्डी येथील मंदिर परिसरातील ओट्यावर झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अद्यात व्यक्तीने पाट्यासारखा दगड त्यांच्या डोकीत मारला. या प्रकारामुळे आतार हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले.

काही वेळाने हा प्रकार समजताच स्थानिक भाविक व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रूग्णालयात हलविले. आतार यांची प्रकृती गंभीर असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर हा हल्ला का व कोणी केला? याविषयी तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT