Accident News: Two youths were killed and one seriously injured in an accident in Maloli
पुढारी वृत्तसेवा : मळोली ता. 23 मळोली ता. माळशिरस येथील अपघातात दोन युवक ठार झाले तर एकजण गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे. मळोली येथील युवक वेळापूरहुन मळोली गावाकडे येत असताना सांगोलावरून अकलूजकडे जाणारी चार चाकी टाटा पंच mh 11 dz 2172 या गाडीने समोरासमोर धडक दिल्याने मोटारसायकलवरील रोहन जाधव, मयूर शिंदे व सागर मगर हे गंभीर जखमी झाले.
यातील रोहन जाधव व मयूर शिंदे यांना रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. चारचाकी टाटा पंच गाडीचा अति वेग असल्याने चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी अपघात झाल्यानंतर दिडशे फूट बाजूच्या गटारात जाऊन पडली.
गाडीची धडक एवढी भीषण होती की यातील एका युवकाचा पाय जागेवरच तुटून पडला. घटनास्थळी गाडीचे विखूरलेले साहित्य, काचा, चप्पल याचे भाग रोडच्या बाजूस दिसून आले. हे तिन्ही युवका इलेक्ट्रिक मोटार वायडिंगचा व्यवसाय करीत होते. दोन मळोली येथील असुन एक युवक निमगाव मगराचे येथील आहे. घटनास्थळी वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस लीगाडे, माळी तसेच पोलीस उपनिरीक्षक यांनी पाहणी केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.