सोलापूर

Lord Vithal dark complexion meaning: श्री विठूच्या सावळ्या रूपाचे वर्णन...

Aashadhi wari 2026: मूर्ती वाळुकाश्म खडकाची असून खडबडीत आहे

पुढारी वृत्तसेवा

पंढरीच्या श्री विठ्ठल मंदिरात विराजमान झालेल्या मूर्तीचे महापूजेच्या वेळी पुजारी मंडळी भक्तांना वर्णन करून सांगतात; पण संशोधकांकडूनही श्री विठ्ठल मूर्तीचे वर्णन केले गेले आहे. ही मूर्ती २ ते २½ फूट उंचीच्या चौक्यावर असून, सोने-चांदीच्या पत्राने महाविलेल्या मखरात आहे.

या मखराच्या मागील बाजूस सोन्याची प्रभावळ आहे. श्री विठ्ठलाला गंध लाकण्याची पद्धतही आगळी-वेगळी आहे. ते कपाळावर दोन भुவयांच्या मध्ये मोठे गोलाकार व खाली कपाळावर दोन भुव्यांच्या मध्ये निमुळते लावले जाते.

विठ्ठलाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

  • मूर्ती वाळुकाश्म खडकाची असून खडबडीत आहे.

  • मूर्तीची उंची साधारण ३ ते ३½ फुताची आहे.

  • मूर्तीचा रंग पूर्णतः वरखा आहे.

  • मूर्तीचा चेहरा उभट व लहान आहे.

  • गळ्यात कंठा असून छातीवर रुळणारा कौस्तुभमणी आहे.

  • छातीच्या उजव्या बाजूस स्पष्ट दिसणारा श्रीवत्स आहे.

  • पोटावर त्रिवळी, कमरेला कमरबंद

  • वामरेला वस्त्र नसून कटिधोत्राचा गोंडा

  • मूर्ती दोन हातांची, दोन्ही हात कमरेवर सारख्याच पातळीत.

  • बोटे मुठीप्रमाणे वळलेली असून डाव्या हाताचा अंगठा वर आहे.

  • डाव्या हातात शंख, उजव्या हातात लांब देठाची कमल कळी.

  • हाताच्या मनगटावर कडी, दंडावर वरचेवरजवळ चतुर्भूषन कडी.

  • चरणावर ध्वज, अंकुश आदी चिन्हे

  • दोन्ही पायाखाली दगडी चौकोनी स्तर असलेली वीट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT