सोलापूर

४ हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाविरोधात गुन्हा दाखल

मोहन कारंडे

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सावकारी दाव्यातील रोजनाम्याची नक्कल देण्यासाठी चार हजाराची लाच मागणाऱ्या सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत माडीवाळप्पा नाईकवाडी (वय ४४ वर्षे) असे लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांचे विरोधात सावकारी दावा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तथा सावकाराचा सहाय्यक निबंधक, सोलापूर यांचेकडे दावा दाखल केलेला होता. या दाव्यास स्थगिती मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी तक्रारदार यांचे विरुध्द दाखल दाव्यातील रोजनाम्याचे नक्कला मिळणेबाबत तक्रारदार यांनी २९ मार्च रोजी अर्ज दिला होता. सदरच्या नक्कला मिळणेसाठी तक्रारदार पाठपुरावा करत असताना लोकसेवक हेमंत नाईकवाडी यांनी ४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला. प्र. वि. सोलापूर येथे दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता नाईकवाडी यांनी लाचेची मागणी करुन ती स्विकारण्याची तयारी दाखवली म्हणून त्यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT