सोलापूर

पंढरपूर : सातारा रोडवर कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

backup backup

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी रस्त्यावरून शेतात फेकली गेली. तर धडक देणारी कार देखील शेतात जावून पलटी झाली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले तर कार चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.२९) दुपारी घडली.

याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्याहून पंढरपूरच्या दिशेने प्रकाश दादा भुजबळ व पत्नी लक्ष्मी प्रकाश भुजबळ हे पती पत्नी शेणवडी (ता. खटाव) येथून पंढरपूरकडे आपल्या दुचाकीवरून येत होते. ही दुचाकी पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे आली असता दुपारी पंढरपूरहून साताऱ्याकडे येणाऱ्या कराने जोराची धडक दिली.

धडक इतकी जोरात होती की समोरून आलेली दुचाकी कारने धडक दिल्याने उडून शेतात पडली तर दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी होऊन जागेवर मरण पावले. कार शेतात जाऊन पलटी झाल्याने चालक संजय साहेबराव नागणे (रा. उपरी) हा जखमी झाला आहे, त्याच्यावर पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याबाबत सीताराम वसंत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT