सोलापूर : गेल्या आक्टोबर महिन्याअखेर पर्यंत शहर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच लाख 3 हजार 472 जणींनी अर्ज दाखल केले होते. त्यातील तीन लाख 34 हजार 714 जणींच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे.
शहर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी दरमहा दीड हजार रुपयांचे राज्य शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले होते. अशा बहुतांश बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यानंतरच्या काळात अन्य महिलांनी देखील प्रस्ताव सादर केले आहेत.
या लाडक्या बहिणींनी सादर केलेल्या अर्जातील त्रुटीमुळे काही अर्जांचे प्रस्ताव नामंजूर झाले आहेत. आजच्या घडीला शहर जिल्ह्यात एकूण दाखल झालेल्या अर्जांमध्ये चार लाख 96 हजार 210 प्रस्ताव मंजूर असले तरी प्रत्यक्षात अंतिम मंजुरीत घट झाली आहे. कारण यामध्ये 61 हजार 496 अर्ज बादर झाले असून, प्रत्यक्षात तीन लाख 34 हजार 714 अर्जांनाच अंतिम मंजुरी मिळाली आहे.
नव्या प्रस्तावकांना पैसे देण्याविषयी अद्यापही आदेश नाहीत. आजही राज्यातील अनेक महिला या योजनेपासून वंचित असल्याने अजून अर्ज करत आहेत. त्यामुळे ती प्रक्रिया अद्यापपर्यंत सुरूच आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आक्टोबरच्या महिना अखेर पर्यंत शहर जिल्ह्यातून अर्ज दाखल केलेल्या आहेत. निकषातील अर्ज मंजूर होत असून निकषात न बसलेले नामंजूर होत आहेतरमेश काटकर, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी