सातारा

सातारा : अत्याचार प्रकरणातील नराधम सापडेना

मोनिका क्षीरसागर

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्हाधिकारी परिसरातून फिरस्त्या असणार्‍या 4 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दीड दिवसानंतरही संशयित नराधम पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मंदिराजवळून 4 वर्षीय मुलीचे सोमवारी पहाटे अपहरण केले. संशयिताने वाहनावरुन त्या मुलीला सोनगाव गावच्या हद्दीत नेले. तेथे मुलीला मारहाण करुन संशयिताने अत्याचार केले. या घटनेने मुलगी भेदरुन गेली. रक्‍तबंबाळ झालेल्या अवस्थेतील पिडीत मुलीला संशयित नराधमाने तेथेच सोडून तो पसार झाला.

मुलगी तेथील एका वृध्द दाम्पत्यापर्यंत पोहचली. तेथून ती मुलगी सातारा तालुका पोलिसांपर्यंत पोहचली. उपचारासाठी तिला सिव्हीलमध्ये दाखल केल्यानंतर त्या मुलीवर जबरी संभोग झाल्याचे समोर आले. मुलगी पहाटे बेपत्ता झाल्यानंतर तिचे पालक शोधत असताना ती सिव्हीलमध्ये असल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी धाव घेतली. मुलीची अवस्था पाहून त्यांनी टाहो फोडला. मुलीवरील पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा तालुका पोलिस ठाण्याचे फौजदार यांनी पोक्सो अंतर्गत अज्ञाताविरुध्द तक्रार दिली. दरम्यान, गेली दीड दिवस झाले पोलिस शोध घेत असताना अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत. यामुळे संशयित आरोपी कोण? पोलिस कधी शोध घेणार? या तपासाकडे लक्ष लागले आहे.

पोलिसांकडून व्हिडीओ, फोटो व्हायरल…

चार वर्षीय चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार केलेला संशयित दिसत असल्याचा व्हिडीओ सातारा तालुका पोलिसांनी जारी केला आहे. हा व्हिडीओ अंधारातील असल्याने संशयित आरोपी स्पष्ट दिसत नाही. त्याची उंची, हावभाव त्यातून दिसून येत आहेत. सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी पोलिस संशयितापर्यंत पोहोचू शकले नसल्याने आता हा व्हिडीओ व्हायरल करून त्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तत्काळ तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक विश्‍वजित घोडके यांनी केले आहे.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT