सातारा : आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जलमंदिरवर जाऊन भेट घेतल्यानंतर त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग खा. उदयनराजेंनी हाती घेतले. त्यावेळी सुनील काटकर.  Pudhari Photo
सातारा

सातारा : उदयनराजे-शिवेंद्रराजेंचे ‘झापूक... झुपूक’

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे शुक्रवारी रात्री ‘झापूक... झुपूक’ झालं. बर्‍याच वर्षांनंतर आ. शिवेंद्रराजे जलमंदिर पॅलेसवर पोहोचले अन् या दोघांमध्ये डायलॉगबाजी रंगली. शिवेंद्रराजेंच्या गाडीचा ताबा घेतल्यानंतर गाडीत लावलेलं ‘झापूक.. झुपूक..’ गाणं ऐकून उदयनराजे म्हणाले, ‘हे असलं-कसलं गाणं लावलंय..’ त्यावर आ. शिवेंद्रराजेंनी ‘गणपतीत सगळीकडं हेच गाणं वाजतंय...’ असं सांगताच उदयनराजेंनी स्माईल दिली. दरम्यान, या भेटीवेळी आ. शिवेंद्रराजेंनी खा. उदयनराजेंना कॅडबरी देत दिलखुलास संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखाना स्थळावर झालेल्या जाहीर मेळाव्यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले एकाच व्यासपीठावर आले होते. याच सभेत दोन्ही राजांचे पुन्हा मनोमीलन झाले. दोन्ही राजांमध्ये आणखी जवळीकता वाढावी यासाठी सातार्‍यातील

गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी विसर्जन मिरवणुकीवेळी दोघांचाही एकच स्वागत मंडप असावा अशी आग्रही मागणीही दै. ‘पुढारी’कडे गुरूवारी केली. या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी शुक्रवारी रात्री खा. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे जाऊन भेट घेतली. दोन्ही राजांमध्ये सुमारे अर्धा तास विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चाही झाली. दोघांच्या दिलखुलास गप्पा झाल्या. आ. शिवेंद्रराजे भोसले हे बर्‍याच वर्षांनी जलमंदिर पॅलेस येथे गेल्याने आठवणीची चर्चा त्याठिकाणी झाली. यावेळी जि.प.चे माजी सभापती सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, प्रितम कळसकर आदि उपस्थित होते.

दै.‘पुढारी’ने म्हटले ‘एकाच मांडवात बसा’ अन् त्याच रात्री एकाच गाडीत बसले

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन्ही राजांनी एकाच स्वागत मंडपात यावे, असे साकडे सातार्‍यातील गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी घातले होते. गणेश मंडळांच्या अध्यक्षांची ही भूमिका उचलून धरत दै. ‘पुढारी’ने शुक्रवारच्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. सातार्‍यातील गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी दै. ‘पुढारी’च्या या वृत्ताचे जोरदार स्वागत केले. याचाच प्रत्यय दोन्ही राजेंच्या भेटीने सातारकरांना आला. ‘पुढारी’ने म्हटले एकाच मांडवात बसा अन् त्याच रात्री दोघे एकाच गाडीत बसले. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT