सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात-पात मानली नाही. आपल्या सर्वांचे रक्त एक आहे. तू माझ्यापेक्षा खालचा आणि मी तुझ्यापेक्षा वरचा आहे, असं म्हणण्याचा मला अधिकार नाही. कोणी नसले तरी मी तुमच्या पाठीशी राहीन. तुम्ही वाजवा.. कोण थांबवतंय मी बघतो, असे वक्तव्य खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
सातार्यातील तालीम संघाच्या मैदानावर छत्रपती दहीहंडी महोत्सवाचे आयोजन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले म्हणाले, कोणी नसले तरी मी तुमच्या पाठीशी राहीन. तुम्ही वाजवा.. कोण थांबवतंय मी बघतो, असे सांगत खा. उदयनराजेंनी कॉलर उडवली. त्यावेळी तरुणांनी प्रचंड जल्लोष केला.