सातारा; पुढारी वृत्तसेवा : खा. छत्रपती उदयनराजे भोसले ( udayanraje bhosale birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त 'चला हवा येऊ द्या' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खा. उदयनराजे यांनी आपल्या अनोख्या स्टाईलने हवेत बाईक चालवत स्टेज वर रॉयल एन्ट्री घेतली. या कार्यक्रमावेळी उपस्थित सातारकरांनी आपल्या लाडक्या राजाच्या एन्ट्रीला दाद देत त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
खा. छत्रपती उदयनराजे ( udayanraje bhosale birthday) यांचा २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस दिवस आहे. त्यामुळे वाढ दिवसाच्या पूर्वसंध्येला राजेंच्या मित्र समुहाने सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या प्रसिद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात उदयनराजे यांनी आपल्या अनोख्या स्टाईलने रॉयल एन्ट्री घेत पुन्हा एकदा आपल्या जनतेची मने जिंकली.
या कार्यक्रमात उदयनराजे यांनी चक्क हवेतून बाईक स्वारी केली. यावेळी हवेतून बाईक चालवत राजेंनी स्टेजवर धमाकेदार एन्ट्री केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेते डॉ. निलेश साबळे यांनी राजेंचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. राजेंच्या या अनोख्या एन्ट्रीने तेथे उपस्थित सातारकरांनी राजेंचे जल्लोषात स्वागत करत त्यांना वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या.