Udayan Raje Bhosale Lok Sabha Oath
दिल्ली : लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले. Pudhari File Photo
सातारा

खा. उदयनराजेंनी घेतली मराठीतून शपथ

पुढारी वृत्तसेवा

सातारा : लोकसभेच्या नवनियुक्त खासदारांना मंगळवारी सकाळी संसदेत शपथ देण्यात आली. यामध्ये सातार्‍याचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मराठी भाषेतून शपथ घेऊन माय मराठीबद्दलचे प्रेम व्यक्त केले. 18 व्या लोकसभेचा सदस्य म्हणून उदयनराजेंनी मंगळवारी लोकसभेत शपथ घेतली.

उदयनराजेंनी घेतली ही शपथ

सातारा जिल्ह्यातील जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे उदयनराजे म्हणाले.

‘लोकसभेचा सदस्य म्हणून परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की, मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य निष्ठा बाळगेन, सार्वभौमतेचे, एकात्मतेचे रक्षण करेन. राष्ट्राप्रतीचे कर्तव्य मी नेकीने पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय..’ अशा शब्दांत उदयनराजेंनी ही शपथ घेतली. उदयनराजेंच्या या कृतीतून त्यांची महाराष्ट्र आणि मराठी भाषेविषयीची आत्मीयता दिसून आली. खा. उदयनराजेंनी लोकसभेत चौथ्यावेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

SCROLL FOR NEXT