Satara Durgamata Visarjan 
सातारा

Satara Durgamata Visarjan | साताऱ्यात दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल

Satara Durgamata Visarjan | सातारा शहरात मंगळवार, दि. २० रोजी दुर्गामाता विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरात मंगळवार, दि. २० रोजी दुर्गामाता विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यानिमित्त शहरात नागरिकांची आणि वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. हे निबंध दि. २१ ऑक्टोबर सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

राजपथावरील कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक, मोती चौक, शेटे चौक, शनिवार चौक ते मोती चौक ते राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका आणि दुर्गामाता विसर्जन कृत्रिम तलाव या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

तसेच मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका या दरम्यानही वाहतुकीस बंदी असेल. समर्थ मंदिर ते चांदनी चौक आणि बोगदा ते शाहू चौक या मार्गावर हलक्या व अवजड वाहनांना, एसटी बससह, प्रवेश बंद राहील.

सज्जनगड आणि कास पठाराकडे जाणारी तसेच येथून येणारी वाहने गोडोली नाका, शिवराज पेट्रोल पंप, खिंडवाडी आणि शेंडे-सोनगाव फाटा मार्गे ये-जा करतील. मोळाचा ओढा येथून शहरात येणारी वाहने महानुभव मठ, करंजे आणि भूविकास बँक चौक मार्गे जातील.

मोती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी शाहू चौक आणि अदालतवाडा मार्गाचा वापर करावा. संबंधित परिसरातील रहिवाशांनीही पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्था
दुर्गामाता विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी तालिम संघाजवळील मैदान, कोनेश्वर मैदान किंवा अन्य पर्यायी जागांवर वाहने पार्क करावीत. विसर्जन मिरवणुकीच्या राजवाडा, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, शनिवार चौक, राधिका चौक, बुधवार नाका ते विसर्जन तलाव या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगला मज्जाव असेल.

या मार्गावरील रहिवाशांनीही आपली वाहने अन्यत्र पार्क करावीत. या निबंधातून रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT