सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा येथील नूतन पोलीस अधीक्षक (एसपी) व गडचिरोलीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना 'केंद्रीय गृह मंत्र्याचे २०२२ चे विशेष ऑपरेशन पदक' जाहीर झाले आहे. देशभरातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना हे पदक जाहीर झाले असून, महाराष्ट्रातील दोन पोलीस अधीक्षकांसह एकूण ११ जणांचा समावेश आहे.
सातारा येथील एसपी समीर शेख यांची गेल्याच आठवड्यात गडचिरोली येथून साताऱ्यात बदली झाली आहे. गडचिरोली येथे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक धाडसी कारवाई झाल्याने त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
हेही वाचा :