संजय राऊत  
सातारा

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नातवाने शेण खाल्ले : खासदार संजय राऊत

निलेश पोतदार

कराड : पुढारी वृत्तसेवा रशियात ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांनी नेमलेले भाडोत्री सैन्य उलटले आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य भाजपाचे भाडोत्री सैन्य असून, हे सैन्य भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांवर केली आहे.

महाविकास आघाडी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विरोधकांची सत्ता उलटवून टाकण्यासाठी जे – जे करावे लागेल, ते सर्व करणार आहे. महाराष्ट्रात भाजपचे भाडोत्री सैन्य राज्य कारभार करत आहे. भाडोत्री हे कोणाचेच नसतात आणि ते बाजारभुंनगे आहेत अशा शब्दात खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नातवावरून संजय राऊत यांची जीभ घसरली…

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नातवाने शेण खाल्ले आहे. मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य आजही आदर्शवत असून, मुंबईत गेल्यावर आम्ही त्यांच्या कार्याची उदाहरणे देतो. मराठी माणसासाठी काँग्रेस पक्षात असूनही लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सकारात्मक भूमिका घेतली होती. महाराष्ट्र उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरून संघर्ष व्हायला नको. त्यांचा सन्मान राखला जावा आणि चर्चेतून मार्ग काढला जावा असे मतही खासदार संजय राऊत यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या साताऱ्यातील नियोजित स्मारकाबाबत व्यक्त केले.

पाटण आणि कोरेगावची जागा आम्हीच लढणार

मागील विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात कोरेगाव आणि पाटण विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार विजयी झाले होते. या दोन्ही उमेदवारांनी गद्दारी केली असली तरी या दोन्ही मतदारसंघात आमच्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. या दोन्ही जागांवर आमचाच दावा असून, या जागा आम्हीच लढवणार आहोत. महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी जागा वाटपासाठी एकत्र येणार आहे. काही जागांची अदलाबदल होऊ शकते. मात्र ज्या जागेवर ज्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत, त्याच जागा लढवण्याबाबत आग्रही असल्याचेही खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT