सातारा : साताऱ्यातील शाहू कला मंदिर या नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. सातारा नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने अभिनेते,नाट्य कलाकार,नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी बोलताना नाट्यगृहा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या नाट्यगृहाचे AC अनेक वेळा बंद पडतात,तर मेकअप रूम आणि स्वच्छतागृह देखील खराब असतात.अडगळीचे साहित्य देखील उघड्यावर टाकण्यात आलं आहे.
ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने हे नाट्यगृह आहे त्याची एवढी दुरावस्था होणे दुर्दैवी असल्याचे सांगत अनेक कलाकारांनी या बाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले आहे.