सातारा

सातारा : कराड नगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; दिवाळी बोनस व अ‍ॅडव्हान्स पगार देण्याची मागणी

मोहन कारंडे

कराड; पुढारी वृत्तसेवा : दिवाळी बोनस व अ‍ॅडव्हान्स पगार मिळावा या मागणीसाठी कराड नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी आज (मंगळवारी) काम बंद आंदोलन केले. यावेळी कचरा डेपो ठेकेदार असणार्‍या एनडीके कंपनीविरोधात कर्मचार्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका कर्मचार्‍यांनी घेतली आहे.

देशात सलग तीन वेळा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलेल्या कराड नगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचारी, कचरा विलगीकरण कर्मचारी, वाढीव भागातील गटारी व रस्ते सफाई कर्मचार्‍यांनी आज काम बंद आंदोलन केले. गेल्या १३ ते १४ वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत आहेत. सध्या या कर्मचार्‍यांची एकूण १७५ संख्या असून एनडीके या कंपनीकडे गेल्या दोन वर्षापासून ठेका आहे. या कंपनीकडून पगार वेळेत मिळत नाही, दिवाळी बोनस दिला जात नाही तसेच अ‍ॅडव्हान्स पगारही देला जात नाही. पीएफ व एसआय कार्डची मागणीही कर्मचार्‍यांची अद्याप पूर्ण झालेली नाही. कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या पगारामध्ये तफावत असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काम बंद आंदोलन करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य नगरपालिका समन्वय समिती पुणे विभाग कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदा खवळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT