सातारा

सातारा : तामजाईनगरमध्ये बेकरीला आग

स्वालिया न. शिकलगार

सातारा: पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील तामजाईनगरमध्ये एका बेकरीला भरदुपारी गॅस सिलिंडरमुळे आग लागल्याने परिसर हादरुन गेला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र साहित्याचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, तामजाई नगर येथे अपार्टमेंटमधील गाळ्यात बेकरी आहे.  त्यामधून अचानक धूर येऊ लागला. पाहता पाहता आग पसरली. परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. काही जणांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT