दुचाकी अपघातात विद्यार्थी ठार 
सातारा

सातारा : सुट्टीवरून कॉलेजला जाताना विद्यार्थी ठार

पुढारी वृत्तसेवा

भुईंज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोशी विहीर येथे भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकीचालक युवकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटे चार वाजता हा अपघात झाला. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. पीयूष प्रशांत कोरे (वय 21) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे; तर साहिल पांडुरंग हजारे (वय 19, दोघेही रा. खेराडे वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीयूष कोरे व साहिल हजारे हे पुणे येथील सिंहगड कॉलेजला इंजिनिअरिंगला आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने ते खेराडे वांगी या त्यांच्या गावी गेले होते. सोमवारी खेराडेे वांगीतून ते दुचाकीवरून पुण्याला निघाले होते. पहाटे 4.30 च्या सुमारास ते जोशी विहीर परिसरात आले. तेथे भरधाव दुचाकीवरचा पीयूषचा ताबा सुटला आणि दुचाकी दुभाजकाला धडकली. परिसरातील लोकांनी त्यांना रुग्णवाहिकेने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पीयूषचा मृत्यू झाला; तर साहिल हा गंभीर जखमी झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT