अंबाजोगाई : कार-कंटेनर टक्कर चार जण जागीच ठार

मृतांपैकी तिघे चाकूर तालुक्यातील जगळपूरचे
Ambajogai Accident
अंबाजोगाई: कंटेनरला धडकल्यानंतर कारची झालेली अवस्था.Pudhari
Published on
Updated on

अंबाजोगाई / चाकूर : अंबाजोगाई-लातूर रोडवर नांदगाव पार्टीजवळ रविवारी (दि.२२) पहाटे - स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघेही जागीच ठार झाले. मृतांमध्ये चाकूर बाजार समितीचे संचालक बाबूराव (माधव) व्यंकटी खलंगरे व अन्य तिघांचा समावेश आहे. न मृतामधील तिचे चाकूर तालुक्यातील जगळपूर येथील आहेत.

शनिवारी रात्री उशिरा जगळपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून - (एमएच २४ एएस ६३३४) संभाजीनगरला निघाले.

जगळपुरात शोककळा सायगावजवळ झालेल्या अपघातात चाकूर तालुक्यातील जगळपूरचे माजी सरपंच आणि विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक बाबूराव खलंग्रे (वय ५५), आत्माराम बाणापुरे (वय ५२), सौदागर कांबळे (वय ३५) आणि शिवराज डोम (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चाकूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मृतामधील डोम वगळता तिघे हे जगळपूरचे रहिवासी आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news