सातारा : पोवई नाका येथे निदर्शने करताना ज्येष्ठ नागरिक.  (Pudhari File Photo)
सातारा

Satara DJ Protest | सातार्‍यात डीजे विरोधात एल्गार

Senior Citizens rally Satara | ज्येष्ठ नागरिकांनी भरपावसात काढला मोर्चा; राजपथ दणाणला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्रात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवासह सर्व उत्सवांमध्ये डीजेचा वापर केला जात आहे. न्यायालयाचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाज सोडला जातो. हा आवाज आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. तरी डीजेला बंदी घालावी म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने गांधी मैदान ते पोवई नाका असा भरपावसात भिजत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी राजपथ दणाणून गेला.

गणेशोत्सवासह सर्व उत्सवांमध्ये डीजेचा वापर केला जात आहे. माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक अशी यंत्रणा आहे हे सिद्ध झाले आहे. डीजे यंत्रणेमुळे हृदयविकार, कर्णबधीरता अशा समस्यांचा सामना करावा लागला आहे. याला अनेकदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन विरोध केला. मात्र, त्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे डीजेला विरोध करण्यासाठी गांधी मैदान राजवाडा ते पोवई नाका असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शांततेच्या मार्गाने डीजे विरोधात घोषणा देत काढण्यात आला. दरम्यान, मोर्चा पोवई नाक्यावर आल्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रतिनिधीस निवेदन देण्यात आले.

या मोर्चामध्ये पुण्यशील सुमित्राराजे भोसले ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ शाहूनगर, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघ, समता ज्येष्ठ नागरिक संघ, माऊली ज्येष्ठ नागरिक संघ, अभिनव ज्येष्ठ नागरिक संघ जिहे, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ राजवाडा, सहवास महिला ज्येष्ठ नागरिक संघ, कै. कर्मवीर डॉ. मार्तंडराव सूर्यवंशी (चाचा) फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया सातारा शाखा तसेच ज्ञानविकास मंडळ आदी 16 संस्था सहभागी झाल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT