सातारा

सातारा : रानगवेही पडले ‘कास’च्या प्रेमात

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : कास पठारावर मनमोहक फुलांचा गालिछा बहरला असून देशविदेशातील पर्यटकांना हे पठार खुनावू लागले आहे. रविवारी कास पुष्प पठार पहावयास आलेल्या पर्यटकांना कास पठारा नजीक फुलांसह रानगव्यांचे दर्शन झाले.

कास पुष्प हंगाम सुरू झाला असून पुष्प पठार रानफुलांनी भरले आहे. पठारावरील फुले पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक पठारावर गर्दी करू लागले आहेत. शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ऑनलाईन बुकिंग अगोदरच फुल झाले असून ऑफलाईन येणार्‍या पर्यटकांची देखील संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. रविवारी सकाळी घाटाई फाटा या ठिकाणी सकाळी साडेनऊच्या सुमारास रानगवे निवांत गवत चरताना पर्यटकांना पहावयास मिळाले. रानगव्यांचा कळप त्या ठिकाणी दिसल्याने पुष्प पठार पाहण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांनी वाहने घाटाई फाट्यावर मध्येच रस्त्यात थांबवून फोटोसेशन केले. बराच वेळ त्या ठिकाणी ट्राफिक जामची समस्या उद्भवल्याने कास पठार कार्यकारी समितीच्या कर्मचार्‍यांनी वाहने पुढे नेण्यास पर्यटकांना प्रवृत्त केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT