सातारा: ‘पुणे येथे बदली ड्रायव्हरचे काम आहे’, असे म्हणून गेलेल्या व्यक्तीने मोबाईलवर ‘सॉरी मी माझी जीवनयात्रा येथे संपवत आहे,’ असा मजकूर स्टेटसला ठेवला होता. सातार्यातील ही बेपत्ता व्यक्ती नाशिकमध्ये असून त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद झाला. यामुळे कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला.
निखिल दिलीप गलांडे (वय 40 रा. सोमवार पेठ, सातारा) असे त्यांचे नाव आहे. ते दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी बेपत्ता झाले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद झाली. कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईल स्टेटसला पाहिले असता “सॉरी मी चुकून कोणाचे मन दुखावले असल्यास माफी मागतो. मी माझी जीवनयात्रा संपवत आहे’ असा मजकूर दिसून आला. त्यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
शुक्रवारी गलांडे यांच्याशी व्हिडिओ कॉलवर पोलिसांचे बोलणे झाले. ते दोन दिवसांत सातारा येथे येणार असल्याचे हवालदार माने यांनी सांगितलेे.