

सातारा : अपार्टमेंटच्या दुसर्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे. समृद्धी प्रवीण मोरे (वय 12, रा. पिरवाडी, ता.सातारा) असे तिचे नाव आहे. गॅलरीमध्ये असताना ही घटना घडली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, मोरे कुटुंबीय दुसर्या मजल्यावर राहते. दोन दिवसांपूर्वी समृद्धी मोरे घरामधील गॅलरीमध्ये काम करत होती. अचानक ती दुसर्या मजल्यावरून खाली पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा रविवारी मृत्यू झाला.