Satara Weather
सातारा : सातारा शहर व महाबळेश्वर परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाँधार पावसाची बॅंटींग सुरु असून दुपार पासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे आगमन झाले. सकाळपासूनच उष्मा वाढला होता. गेल्या काही दिवसांपासूनच शहर व परिसरात थंडी व धुके निर्माण झाले होते. मात्र, अचानक आज (दि.१२) दुपारी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.
गेल्या महिन्यापासून सातारा शहरामध्ये उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. नागरिक देखील या उन्हामुळे त्रस्त होते. मात्र, आज सातारा शहरांमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मान्सून लवकरच दाखल होत असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापारांसह नागरिकांमध्ये मोठी तारांबळ उडाली.
महाबळेश्वरमधील हवामान पर्यटकांसाठी आल्हाददायक ठरले असले तरी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर हा अवकाळी पाऊस काहीसा दिलासादायक वाटला तरी, काही ठिकाणी यामुळे अडथळे निर्माण झाले.