Satara News file photo
सातारा

Satara News: लग्नाला अवघे १० दिवस, अंगावरची हळदही उतरली नव्हती; तोवर नियतीचा घाला! भीषण अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू

कराड–चिपळूण राष्ट्रीय मार्गावर येरफळे (ता. पाटण) गावच्या हद्दीत भीषण अपघातात नवविवाहित दांपत्याचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Satara News

पाटण: कराड–चिपळूण राष्ट्रीय मार्गावर येरफळे (ता. पाटण) गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात नवविवाहित दांपत्याचा मृत्यू झाला. लग्नाला अवघे दहा दिवस झाले असताना घडलेल्या या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सडादाढोली येथील राजू विठ्ठल झोरे (वय २५) व पत्नी राणी राजू झोरे (वय २३) हे दोघे दुचाकीवरून शिराळा येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी निघाले होते. येरफळे गावाजवळील गारवा हॉटेलसमोर ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाशी त्यांच्या दुचाकीची जोरदार समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला.

या अपघातात राजू झोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या राणी यांना कराड येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पिकअप चालक सचिन यशवंत मोहिते (रा. बोंद्री) याच्याविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT