सातारा

सातारा जिल्हा बँक : नागरी बँका मतदार संघ- लेंभे आणि जाधव यांच्यात टस्सल होणार का?

Shambhuraj Pachindre

नागरी सहकारी बँका व पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनलचे उमेदवार रामभाऊ लेंभे विरूध्द शिवसेना नेते शेखर गोरे समर्थक सुनील जाधव यांच्यात लढत होत आहे. लेंभे यांना पॅनलचे पाठबळ असून सुनील जाधव यांची ताकत मर्यादित आहे. तरीही शेखर गोरे काही मॅजिक करणार का? त्यांना आ. जयकुमार गोरेंची ताकद मिळणार का? की लढत 'वन वे' होणार याविषयी उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

नागरी बँका मतदार संघातून तब्बल 18 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 16 जणांनी माघार घेतली. नागरी सहकारी बँक मतदारसंघासाठी एकूण 374 मतदान आहे. यामध्ये सातारा 92, कराड कराड 69 आणि फलटण 55 या तालुक्यात सर्वाधिक मतदार आहे. या तालुक्यांमध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलची साथ लेंभे यांना मिळणार आहे. पॅनलची ताकद असली तरी लेंभे यांच्याकडून ओळखीच्या सर्व मतदारांशी गाठीभेटीचा सिलसिला सुरू केला आहे. तर इतर तालुक्यातील मतदारांशीही ते संपर्क साधत आहेत.

दुसरीकडे शेखर गोरे समर्थक सुनील जाधव हे माण तालुक्यातील एका पतसंस्थेचे अध्यक्ष आहे. जाधव यांचा माण व खटाव तालुका वगळता इतरत्र संपर्कही नाही. तरीही आपल्या परीने तेही मतदारांच्या भेटी गाठी घेत आहे. या मतदार संघात शेखर गोरेंनी काही मॅजिक केली तरच निवडणुकीत रंगत येणार आहे. तसेच त्यांना आ. जयकुमार गोरे पाठिंबा देणार का? हेही पाहणे औत्सुक्याचे आहे.

पाहा व्हिडिओ : मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला

https://youtu.be/AKuoLpW0oO4

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT